Thursday, April 23, 2020

चला तर शिकूया मराठी नाश्ता किंग कांदेपोहे

१) कांदे पोहे :-

              कांदे पोहे हे एक प्रसिद्ध मराठी ब्रेक फास्ट आहे जायला कि मराठीत नाश्ता असे म्हणतात. साधारणत महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस कांदे पोह्याच्या आस्वादापासून अलिप्त नसेल कारण प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ नष्ट्यासाठी हमखास बनवला जातो. तर आज आपण कांदे पोहे हा नाश्ता किंग कसा बनवतात हे पाहुयात.

साहित्य:- कांदापोहे बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे साहित्य लागेल पोहे,शेंगदाणे,जिरा,मोहरी,कूकिंग ऑइल,हळद,लाल तिखट,मीठ,कांदे,हिरवी मिरची,लसून,कोथंबीर,कडीपत्ता,साखर,लिंबु.

कृती:- सुरुवातील २ कांदे चिरून घ्यावे त्यासोबत ५ हिरव्या मिरच्या आणि कोथांबीर कापून घ्यावी त्यानंतर ४ लसूण पाकळया आणि थोडासे जिरे ठेसून घ्यावे. आता आपल्या अंदाजानुसार पोहे घ्यावेत आणि त्यांना धावून घ्यावे, धुवताना विशेष काळजी हि घ्यावी कि जास्त वेळ पोहे पाण्यातच नाही ठेवायचे जास्तीत जास्त १० ते २० सेकंद पाण्यात ठेऊन लगेच सर्व पाणी काढून घ्यावे. आता गॅस चालू करा आणि एका कढईत खाण्याचे तेल टाका आपल्या अंदाज अनुसार टाकावे नंतर तेल थोडं गरम झाल्यावर शेंगदाणे,मोहरी आणि जिरं हे तीनही एकदाच टाकावे शेंगदाणे तसेच जिरे यांना थोडासा रंग आल्यावर चिरलेली मिरची आणि कडीपत्ता टाकावा १० सेकंद नंतर चिरलेले कांदे आणि ठेचलेली लसूण जिरा पेस्ट पण  टाकून द्यावी कांदा थोडा रंग बदलत आहे असे वाटले कि लगेच हळद, मीठ,(चावीनुसार) लाल तिखट(एकदम कमी चिमटभर) सर्व एकदाच टाका आणि २ मिनिटे परतवत राहा. आता पूर्ण फोडणी एकजीव झाली असे वाटले कि नंतर गॅस फ्लेम एकदम कमी करा आणि पाण्यातून काढलेले पोहे त्यात टाका आणि २ मिनिटे मस्त परतवत एकजीव करत राहा.  आता वेळ आहे कोथांबीर लिंबाचा रस आणि साखर (फक्त अर्धा चमचा) टाकायची,लिंबाचा रस पण जास्त नाही टाकायचा या गोष्टी फक्त चविष्टपण येण्यासाठी टाकायच्या. आता परत एकदा परतून घ्या आणि २ मिनिटे तसेच ठेवा...... आता पोहे रेडी आहेत...  


Kande Pohe is a famous Marathi breakfast that is called Nasta in Marathi. Normally, every Marathi person living in Maharashtra will not be detached from the taste of onion pohe as this dish is specially prepared for destruction in every Marathi household. So today let's see how to make Onion Pohe Breakfast King.


Ingredients: - Ingredients for making onion pohe include pohe, peanuts, cumin, mustard, cooking oil, turmeric, red chili powder, salt, onions, green chilies, garlic, cilantro, curry leaves, sugar, lemon.


Method: - Initially chop 2 onions along with 5 green chilies
and cilantro then add 4 garlic cloves and a little cumin 
seeds. Now take pohe according to your estimation and 
run them, while washing, take special care not to keep 
the pohe in water for too long, keep it in water for 
maximum 10 to 20 seconds and remove all the water 
immediately. Now turn on the heat and put cooking oil 
in a pan. Add oil as per your estimate. When the oil is 
slightly hot, add peanuts, mustard seeds and cumin seeds 
at once. When peanuts and cumin seeds are slightly colored,
 add chopped chillies and curry leaves. After 10 seconds, 
add chopped onions and crushed garlic. But the discarded 
onion seems to be changing color a bit. Now it seems that 
the whole burst has become homogeneous. Then lower the 
gas flame and put the poha out of the water and keep stirring 
for 2 minutes. Now it's time to add cilantro, lemon juice and
sugar (only half a teaspoon), lemon juice but not too much. 
Now take it back once and keep it for 2 minutes ...... now it is ready..